वडगाव नगरपंचायतने शहरातील नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात-सायली म्हाळसकर
मावळ :
मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच समस्या व प्रश्न जाणून घेण्यासाठी मा. उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली काही महिन्यांपूर्वी वडगाव शहरामध्ये प्रथमच जनसंवाद यात्रा म्हणजेच लोक संपर्क अभियान राबवण्यात आले होते या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत अनेक नागरिकांनी वडगाव नगरपंचायत मार्फत पुरवल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांच्या संदर्भात आपल्या समस्या व तक्रारी म्हाळसकर यांच्यापुढे मांडल्या होत्या यापैकी काही समस्यांचा त्यांनी जागीच निपटारा केला होता.मात्र काही समस्यांचे निवारण हे वडगाव नगरपंचायत मार्फत त्वरित करण्यात यावे यासाठी म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली आज त्यांच्या शिष्टमंडळाने वडगाव नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक मनिषा चव्हाण यांची भेट घेतली व त्यांना वडगांव नगरपंचायतीच्या वतीने देण्यात येणाऱ्या मुलभूत सोयीसुविधांच्याबाबत सर्व समस्या व अडचणी सोडविण्यासाठी त्वरीत निर्णय घेण्यात यावा.याबाबतचे निवेदन त्यांना देण्यात आले.
यावेळी मनसे नेते रुपेश म्हाळसकर, तानाजी तोडकर,गणेश भांगरे, संतोष म्हाळसकर,आशिष म्हाळसकर, सुहास इंदलकर,सुहास कराळे, आदित्य म्हाळसकर, रोहित कोळी आदींजण उपस्थित होते.