*संविधान प्रतिकृती विटंबनेचा भिमशक्ती संघटनेच्या वतीने तीव्र निषेध*

SHARE NOW

परभणी: जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यानजीक असलेल्या संविधान शिल्पाच्या प्रतिकृतीची माथेफिरू व्यक्तीने विटंबना केल्याची घटना घडली आहे. या कृत्याचा भिमशक्ती संघटनेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

भिमशक्ती संघटना भोसरी विधानसभेचे अध्यक्ष पै.महेश रमेश अरुण यांनी या घटनेबद्दल आपला संताप व्यक्त केला आहे. “सदर माथेफिरूचे हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे. यामुळे समाजात अशांतता पसरू शकते. पोलिसांनी संबंधित माथेफिरूला तात्काळ अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement

या घटनेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या जनसमुदायामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना ही केवळ एका प्रतिकृतीवरील हल्ला नसून भारतीय संविधान व समाजाच्या मूलभूत तत्त्वांवर प्रहार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून समाजातील सर्व घटकांनी शांतता राखून कायद्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page