विश्व महासन्मान जीवन गौरव पुरस्काराने नंदकुमार शेटे महाराज सन्मानित
वडगाव मावळः मावळ तालुक्यातील भजनसम्राट नंदकुमार शेटे (शेटेवाडी,शिरे)यांना काल (ता.९) विश्व महासन्मान जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्री क्षेत्र संगमेश्वर (ता.मुरबाड,जि.ठाणे) येथील आंतरराष्ट्रीय संत संमेलन व दर्शन आशिर्वचन महासन्मान सोहळ्यात काशी विद्वत परीषद प्रभारी नामदेव महाराज हरड यांच्या हस्ते तो देण्यात आला.यावर्षीच २२ ऑक्टोबरला कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेचा कलाभूषण पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
संगमेश्वर येथे कालपासून हा आंतरराष्ट्रीय संत सोहळा सुरु झाला असून तो १३ तारखेपर्यंत चालणार आहे. आहे.देशातील १११ तपस्वी साधूसंत,महंत,आध्यात्मिक गुरु त्याला हजेरी लावणार आहेत.सोहळ्याचे अध्यक्ष हरड महाराजांच्या हस्ते पहिल्याच दिवशी शेटे महाराजांना सपत्निक विश्व महासन्मान जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मंचावर अनेक संतमहंत, मठाधिपती उपस्थित होते.मावळातून शंकरमहाराज मराठे,उद्योजक खंडुजी टकले,नंदकुमार तथा बाबूजी वाळंज, अजय काळभोर तसेच किरण घोलप, आरती भेगडे, आशा शेटे आदींनीही या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली. यापूर्वी शेटे महाराजांना मावळ भुषण भजनसम्राट, मावळ रत्न कलागौरव, कलारत्न भूषण आदी पुरस्कार मिळालेले आहेत.
——————–