*“बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते। तस्माद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम्”।।*
तळेगाव दाभाडे :
ॲड पु वा परांजपे विद्या मंदिरामध्ये सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रम राबविण्यात आला. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री श्री संजय तथा बाळा भेगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळांमध्ये सामुदायिक सूर्यनमस्कार हा उपक्रम राबविण्यात येत आहे भारताचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना योग साधनेचे महत्त्व कळावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे जगातील सर्वात तरुण देश असणारा आपला भारत भविष्यकाळात महासत्ता बनवायचा असेल तर भारतातील तरुण पिढी ही शरीराने व मनाने सशक्त असणे गरजेचे आहे त्यासाठी योग्य आहार दैनंदिन व्यायाम आणि योग साधना यांना विशेष महत्त्व देणे गरजेचे आहे सुयोग्य आचार विचार आणि उच्चार यातून सुसंस्कारित निरोगी सदृढ व आत्मविश्वासपूर्ण तरुण भारत घडविण्याचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे असे मत श्री संजय तथा बाळा भेगडे साहेब यांनी व्यक्त केले यासाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळातील सर्व शाळांमधील विद्यार्थी दररोज किमान २० सुर्यनमस्कार करून आपल्या दिवसाची सुरवात करतील या उपक्रमाचा श्रीगणेशा नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मा श्री संजय तथा बाळा भेगडे साहेब यांनी स्वतः शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत सूर्यनमस्कार करून केला
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री संजय तथा बाळा भाऊ भेगडे यांनी शाळेतील भौतिक सुविधांच्या विकास कामांचा आढावा घेऊन शाळेत नुकत्याच सुरू झालेल्या डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड क्लासरूमची पाहणी केली विद्यालयामध्ये होत असलेल्या भौतिक सुविधांची पूर्तता व विकास कामे तसेच विद्यार्थ्यांमध्ये झालेली गुणवत्तावाढ यासाठी विशेष कौतुक केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले आभार विद्यालयातील शिक्षिका आशा आवटे यांनी मानले सूत्रसंचालन प्रभा काळे यांनी केले