विश्व् जीवन गौरव देऊन समाजसेवक,नंदकुमार वाळंज (बाबूजी) यांचा सन्मान.
आंबवणे :-
आंबवणे येथील जेष्ठ समाजसेवक ह भ प मा. नंदकुमार वाळंज यांना महासन्मान सोहळ्यात विश्व जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. वाळंज यांनी सामाजिक, शैक्षणिक, आध्यत्मिक, वारकरी संप्रदाया साठी केलेल्या अतुलनीय कार्या बद्दल हा पुरस्कार दिला असे आयोजकांनी सांगितले.
विश्व सनातन महाराष्ट्र राज्य तत्वावधान महासन्मान संत समिती श्री क्षेत्र संगमेश्वर जि. ठाणे. यांच्या वतीने आयोजित
आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन व दर्शन आशीर्वचन महासन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला.. त्यात सदर सनातन समिती व शंकराचार्य स्वामी नारायनानंदतीर्थ, कुंभमेला समिती प पु. महंत श्री रामनारायणदासजी नाशिक, काशी विद्वत परिषद आचार्य प पू. रामनारायणजी द्विवेदी,
धर्मगुरु स्वामी ओमानंदतीर्थ या सर्व धर्मगुरू आचार्य परमेश्वर रुपी संत मंडळीच्या पवित्र हातानी दिमाखदार सोहळ्यात जेष्ठ समाजसेवक व मुळशी मावळ भूषण आदरणीय श्री.नंदकुमार वाळंज यांना” विश्व् जीवन गौरव” प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात 111साधू महंत धर्मगुरू उपस्थित होते. आंबवणेकर, मुळशी धरण विभाग, मावळ व लोणावळा येथील सर्व स्नेही यांच्या कडून बाबूजींना शुभेच्छा प्राप्त होत आहेत. भव्य सोहळ्यात हिंदू धर्मगुरू यांचे प्रत्यक्ष दर्शन घडले. व आशीर्वाद प्राप्त झाला. त्याबद्दल स्वतःला धन्य समजतो. आणि या संत महंत याच्या शुभ हस्ते आयोजकांनी विश्व् जीवन गौरव पुरस्कार देऊन मला कृत कृत्य केले. हा सोहळा माझ्या आयुष्यात मी विसरणार नाही असे मत मा. नंदकुमार वाळंज यांनी व्यक्त केले. व आयोजकांचे आभार मानले.