वाळंज विद्यालयात “हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान” उपक्रमाला सुरवात…

SHARE NOW

आंबवणे :-

तालुक्यातील सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे येथे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघा च्या वतीने ” हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान “या

संस्कारक्षम व प्रेरणादायी उपक्रमाचीच्या अंमलबजावणी बाबत शिक्षक श्री रवींद्र सोनवणे यांनी माहिती दिली.

श्री सोनवणे म्हणाले, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रीयभाव, अनुशासन, सामाजिक समरसता, शाळेची व शाळेतील साधन संपदेची काळजी घेणे, नागरी कर्तव्याचे पालन होणे हे मूल्य विद्यार्थ्यामध्ये विकसित होतील.या हेतूने महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम प्रभावी पणे राबविण्यात येत आहेत.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. भटू देवरे यांनी मार्गदर्शनात

Advertisement

कर्तव्यनिष्ठता, सामाजिक समर्पण व ऐक्य, जबाबदारीची जाणीव,उत्तम चरित्र घडवणे या बाबींचा विद्यार्थ्यामध्ये विकास व्हावा या साठी हा उपक्रम शाळेत राबवण्याचे धोरण आहे. शाळा म्हणजे विद्येचे मंदिर आणि मंदिरात जाताना श्रद्धा आणि समर्पनाचा भाव आपोआप येत असतो. या उपक्रमात सुरवातीला शिस्त, स्वछता, समाजसेवा, शाळेतील प्रत्येक वस्तू चे संरक्षण, नीट नेटकेपणा उत्तम व्यवस्थापन हे महत्वाचे मूल्य रुजवन्यावर भर देऊ असे मत मांडले. या उपक्रमाचे प्रभावी आयोजन करू असे मत श्री देवरे यांनी मांडले. शिक्षक दिनाचे औचित्य असल्याने संस्था अध्यक्ष मा नंदकुमार वाळंज, संचालिका सौं वत्सला ताई वाळंज, संचालक मा गणपत मेंगडे, सा. कार्यकर्ते सुरेश दादा कालेकर यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. संजय कुलथे यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब खेडकर, राहुल आवळे, विजय दळवी, शालिनी देवरे, महादेव खेडकर, संतोष दळवी व विदयार्थी यांनी “हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान” उपक्रमाच्या नियोजनांकरिता आश्वासित केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page