सार्वजनिक गणेश विसर्जन नियोजित केंदावरच करण्याचे नगरपरिषद प्रशासनाचे गणेश मंडळाना आवाहन.

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :- तळेगाव दाभाडे नगर परिषदे मार्फत तळेगाव दाभाडे शहरात गणेशोत्सव पर्यावरणपुरक पध्दतीने साजरा करणेसाठी व जलप्रदूषण रोखण्याच्या अनुषंगाने नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन तलाव, विहीर, नदी व इतर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता नगरपरिषदे मार्फत उभारण्यात आलेल्या केंद्रावर मूर्तीदान करावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी केले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदे मार्फत शहरातील गणेश मंडळाच्या सोयी करिता शहरात विविध ठिकाणी मूर्ती दान केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच ज्या न

Advertisement

मंडळाना व गणेश भक्त नागरिकांना घरी मूर्तीचे विसर्जन करावयाचे आहे अशा नागरिकांनी नगर परिषदे मार्फत नगर परिषद कार्यालय व संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र.६ या दोन ठीकाणी अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे मोफत वाटप करण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य संकलन करणे साठी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागा मार्फत दररोज ट्रॅक्टर द्वारे निर्माल्य कलश फिरविण्यात येणार आहे. तसेच मूर्ती दान केंद्राच्या ठिकाणीही निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. शहरातील नागरिकांनी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी निर्माल्य इतरत्र न टाकता निर्माल्य कलशात टाकावे, असे आवाहन नगरपरिषदे मार्फत मुख्याधिकारी यांनी कले आहे.

विसर्जन केंद्रे खालील प्रमाणे

अ) खालील प्रमाणे मूर्तीदान व विसर्जन केंद्र स्थापन करण्यात आली आहे. १) नगरपरिषद कार्यालय मागील नयूभाऊ भेगडे पाटील शाळेचे मैदान

२) गाव तळे शेजारी

३) गाव तळे शेजारी (खंडोबा माळ)

४) जुनी नगरपरिषद समोर, आदर्श शाळेजवळ

५) यशवंतनगर (गोल ग्राउंड)

६) संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्र.६ (गुलाबी शाळा)

७) D-Mart शेजारी

ब) खालील ठिकाणी मूर्तीदान केंद्र स्थापन करण्यात आली आहे

१) बनेश्वर मंदिर

२) नगरपरिषद कार्यालय समोर

 

 

 


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page