लायन्स क्लब ऑफ तळेगावच्या वतिने “पाणी अडवा, पाणी जिरवा”!.या अभियानंतर्गत बंधारे बांधनी उपक्रम.
तळेगाव दाभाडे :
ग्रामीण भाग जरी गाव म्हणून असला तरी तेथे शहरी सुख सोई उपलब्ध आहेत परंतु काही ठिकानी आजही पाण्याच्या समस्यानी ग्रामस्थ त्रस्त आहे ,
महिला पाण्यासाठी गाव गावे पायपिट करित आहेत पाण्याच्या कमतरतेने आजही गावातील विहिरी पाण्यावीना कोरड्या आहेत, ओढ़े नाले,कोरड्या झाल्यात.
गाय, म्हैस पशुधन असनारे शेतकरी यांनी अपला दुग्ध व्यवसाय बंद ठेवलाय ,कारण पाण्याच्या कमतरतेमुळे
विशेषता जमीनित भूजल साठा वाढवायचा असेल तर जमीनीत पानीसाठा, पाणी मुरने गरजेचे असल्याने शासनाने ज्या ज्या ठिकानी शक्य होईल तेथे बंधारे बांधून पाणी अडवले. शेतात शेततळे उभारण्यासाठी शासनाने सबसिडी देऊन कर्ज देऊन प्रवृत्त केले,
या गोष्टिंचा शासन दारी योग्य पाठ पूरावा होत नसल्याचे दिसून येत आहे.
हीच समस्या लक्षात घेऊन अखेर गावागावात बंधारे बांधूंन पाणी साठा करण्याचे काम जोरात सुरू आहे.याच कामाचा एक भाग म्हणून मावळ पंचक्रोशीतिल मौजे-डोने,मौजे-निगड़े,मौजे-कोंडीवडे या गावांमध्ये लायन्स क्लब ऑफ तळेगाव च्या वतीने बंधारे बांधले आहेत काही ठिकानी बंधारे घालण्याची काम चालू आहेत .
ही संपूर्ण माहिती लायन्स क्लब चे अध्यक्ष श्री,अनिकेत नंदकुमार काळोखे यांनी दिली ते म्हणाले,की ही बंधारे बांधन्याचे उद्धिष्ट असे आहे की, सध्या गाव गावात नळयोजनेद्वारे पाणी पूरवठा केला जोतोय .
पाणी नसल्याने ज्या शेतकरी यानी दुग्ध व्यवसाय बंद केला त्यांनी ही आता तो सुरू केला कारण बंधारे बांधल्याने पाण्याचा साठा उपलब्ध झाला शेजारील विहिरित पाणी साठले पाणी मुरल्याने हा साठा झाला
शेतकरी यांचा महत्वाचा निकड़ी चा गरजेचा विचार करुण लायन्स क्लब ऑफ तळेगाव यानी मावळातील या गावांत बंधारे बांधले आणि अजून ही काम सुरू आहेत असे लायन्स क्लब ऑफ तळेगाव चे अध्यक्ष श्री.अनिकेत नंदकुमार काळोखे यानी “पाणी आडवा ! पाणी जिरवा !”या अभियानंतर्गत हा उपक्रम राबवित असल्याची माहिती सांगताना ते बोलत होते.