रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीतर्फे मोफत कल चाचणी व आयडियल स्टडी अॅपचे वाटप
तळेगाव दाभाडे :
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष रो. संतोष जी खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी आणि लोटस कॉम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कल चाचणी (Aptitude Test) घेण्यात आली. या चाचणीचा उद्देश दहावीच्या विद्यार्थ्यांना दिशादर्शक करिअर निवड करण्यासाठी मार्गदर्शन करणे हा होता.
शनिवार, सकाळी १० वाजता स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे येथे ही चाचणी पार पडली. यामध्ये दहावीच्या ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष रो. प्रवीण भोसले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रकल्प प्रमुख व सचिव रो. संदीप मगर यांनी ही कल चाचणी टेक्निकल आणि सायंटिफिक बेसवर आधारित असून सात वेगवेगळ्या घटकांवर विद्यार्थ्यांची क्षमता तपासली जाते, ज्यामुळे त्यांना अचूक रिपोर्ट मिळतो आणि त्यांचा करिअर निवडीसाठी योग्य मार्गदर्शन होऊ शकते, असे सांगितले.
या उपक्रमादरम्यान दहावीच्या ६५ विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी अॅप’ देखील वाटप करण्यात आले.
या प्रकल्पाच्या यशस्वी आयोजनासाठी खालील रोटरी सदस्यांचे विशेष योगदान लाभले –
रो. प्रवीण भोसले, रो. संदीप मगर, रो. विन्सेंट सालेर, रो. शंकर हादिमनी, रो. सचिन कोळवणकर, रो. अजय पाटील, रो. दशरथ जांभुळकर, रो. पांडुरंग पोटे, रो. मच्छिंद्र घोजगे, रो. युवराज बढे, रो. दीपक बागल, रो. रवी दंडगव्हाळ, रो. विलास टकले, रो. अंतोष मालपोटे, रो. सुनील खोल्लम, रो. सुमती निलवे, रो. रेणू शर्मा.
तसेच या कार्यक्रमासाठी लोटस कॉम्प्युटर आणि त्यांचा स्टाफ, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल व शिक्षकवर्ग यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीतर्फे या सामाजिक उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.






