मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर संपन्न

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, दिग्विजय मित्र मंडळ, स्वामी समर्थ डेव्हलपर्स आणि पार्वती नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिर व चष्मा वाटप कार्यक्रम शनिवार, दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता वडगाव येथील दिग्विजय कॉलनी, माय फर्स्ट स्कूल शेजारी, हॉटेल शिवराज समोर पार पडला.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव रो. संदीप मगर यांनी केले. प्रकल्प प्रमुख डॉ. अशोक दाते यांनी मार्गदर्शन करताना डोळे तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, मोतीबिंदू हा आजार लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आढळून येतो आणि वेळेत निदान झाल्यास तो सहज बरा होऊ शकतो. २५,००० पेक्षा जास्त मोतीबिंदू ऑपरेशन्सचा अनुभव असलेले डॉ. दाते यांनी उपस्थितांना नेत्र आरोग्यविषयी सविस्तर माहिती दिली.

Advertisement

 

सह-प्रकल्प प्रमुख रो. गणेश भेगडे यांनी हा समाजोपयोगी उपक्रम वडगाव परिसरातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. रो. शंकर हादिमनी यांनी आपल्या मनोगतात गणेश भेगडे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना नेत्र तपासणीबाबत महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या.

 

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनायक भेगडे यांनी केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी रो. दशरथ जांभुळकर यांनी निभावली.

 

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खालील रोटरी सदस्यांचे विशेष योगदान लाभले –

रो. प्रवीण भोसले, रो. संदीप मगर, रो. विन्सेंट सालेर, रो. अशोक दाते, रो. गणेश भेगडे, रो. मच्छिंद्र घोजगे, रो. शंकर हादिमनी, रो. हिरामण बोत्रे, रो. सचिन कोळवणकर, रो. अजय पाटील, रो. दशरथ जांभुळकर, रो. पांडुरंग पोटे, रो. अंतोष मालपोटे.

 

या सामाजिक उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page