प्राचार्य डॉ.संभाजी मलघे सर यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचे भाजगाव येथे उद्घाटन
**प्राचार्य डॉ.संभाजी मलघे सर यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचे भाजगाव येथे उद्घाटन***
तळेगाव दाभाडे :
इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मुक्काम भाजगाव पो. करंजगाव या ठिकाणी सोमवार दि. २ डिसेंबर२०२४ ते ८ डिसेंबर २०२४ या कालावधीत संपन्न होत असताना इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलघे सर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना ते म्हणाले या भाजगाव मधील कनिष्ठ महाविद्यालयाचे २४ वे श्रमसंस्कार शिबिर संपन्न होत आहे. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. शिबिरात सहभागी झाल्यानंतर विद्यार्थी अनुभवाची शिदोरी घेऊन येथून जात असतो. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. ती सामाजिक दायित्वाची भावना निर्माण होते. संपूर्ण मावळ तालुक्यात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे एकूण ७५ शिबिरे संपूर्ण मावळ तालुक्यात संपन्न झाली. त्यानिमित्ताने आम्हाला अंदर मावळ, पवन मावळ, नाणे मावळ फिरता आले. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांसाठी ” माझं गाव” नावाची कविता सादर केली.असे अनेक उपक्रम राबवत असताना आम्हाला इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मा. श्री. रामदासजी (आप्पा) काकडे यांच्या दूरदृष्टीमुळे आम्हाला प्रेरणा मिळते. ग्रामस्थांना माहिती देताना प्राचार्य मलघे सर म्हणाले की काकडे साहेबांच्या नेतृत्वामुळे, मार्गदर्शनामुळे इंद्रायणी कॉलेज आधुनिक काळाची पाऊले टाकत विविध टेक्निकल अभ्यासक्रम राबवत आहे. यानिमित्ताने प्राध्यापक देवडे सर, प्रा. के. डी .जाधव सर यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा. एपिसोड प्राध्यापिका भोसले मॅडम तेलंग मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा. डोके सर यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. आर.सर यांनी मांडले.
श्रमसंस्कार शिबिरासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक.एस..पी.भोसले सर,संस्थेचे कार्यवाह, आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांतजी शेटे साहेब तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, श्री गोरख काकडे या सर्वांनी शिबिरास शुभेच्छा दिल्या.