वन्यजीवांचे संरक्षण करणे काळाची गरज-मा.श्री निलेश गराडे
मावळ :
मंगळवार दि. 3.12.2024 रोजी सकाळी सहा वाजता नियमित चार किलोमीटर रनिंग तसेच सर्व शिबिरार्थीसाठी व्यायामाचे विविध प्रकार त्यामध्ये असन,योग,प्राणायाम कशासाठी केली पाहिजे? आपल्याला शरीरासाठी किती फायदे असतात.हे सर्व प्रात्यक्षिकाद्वारे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक एस. आर.जगताप सर यांनी करून दाखविले तसेच सर्व शिबिरार्थीकडूनही त्यांनी करून घेतले.नंतर सर्व शिबिरार्थींनी ग्रामस्वच्छता अभियान गावामध्ये पूर्ण केले मा. निलेश गराडे व मा. श्री. जिगर सोळंकी यांनी शिबिरार्थी व ग्रामस्थांना आपत्ती व्यवस्थापन व वन्यजीव संरक्षण याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. त्यामध्ये विषारी व बिनविषारी सापांची माहिती दिली .तसेच ते कसे ओळखायचे? विषारी साप चावल्यानंतर कोणत्या उपाययोजना करायच्या? तसेच साप पकडल्यानंतर ते जंगलामध्ये कसे रेस्क्यू करायचे? याची माहिती दिली.त्याचबरोबर त्यांचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे म्हणून आपण जनजागृती केली पाहिजे असे त्यांनी सांगितले. तसेच अलीकडच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसं मध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढलेले आहे .त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक आलेल्या माणसाचे प्राण कसे वाचवता येतात. त्याचेही त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. सर्व ग्रामस्थांना शिबिरार्थींना त्यांनी अगदी मंत्रमुग्ध केले.तसेच सायंकाळी गटचर्चेसाठी शिबिरार्थी विद्यार्थ्यांना१)आरक्षण असावे की नसावे?२) मोबाईलचा वापर चांगला की वाईट?३)आजचा युवक विद्यार्थी की परीक्षार्थी?या विषयांवर आपली विविध मते शिबिरार्थींनी मांडली.