साप्ताहिक अंबर यांच्यावतीने श्रीमती सुलोचना दत्तात्रय खांडगे यांना जीवन गौरवा प्रीत्यर्थ मानपत्र प्रदान
साप्ताहिक अंबर यांच्या वतीने श्रीमती सुलोचना दत्तात्रय खांडगे यांना जीवन गौरवा प्रीत्यर्थ मानपत्र रविवारी (दि.०७) प्रदान
करण्यात आले.आईसाहेब खांडगे यांचे कर्तृत्व, मातृत्व व दातृत्व असे व्यक्तिमत्व आहे. जुन्नर तालुक्यातील आणे गाव येथील पाटील घराण्यात त्यांचा जन्म झाला. स्व. बाबूराव दाते पाटील त्यांचे वडील होत. विवाहानंतर स्व. मामासाहेब खांडगे यांच्या सर्वदृष्टीने संपन्न असलेल्या समाजप्रेमी घराण्यात सूनबाई म्हणून आल्या.त्यांनी समाजसेवेचा मेरुपर्वत उभा केला. कर्तव्यपरायणतेने त्यांनी आपले जीवन व्यतीत केले आहे. याचा गौरव म्हणून त्यांना साप्ताहीक अंबरच्या वतीने ‘जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.त्यांचे पती स्व.दत्तात्रय(आप्पा) खांडगे, चिरंजीव शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. संतोषजी खांडगे, आणि उद्योजक श्री. स्वानंदजी खांडगे, सूनबाई सौ. रजनीगंधा खांडगे, व सौ, माधुरी खांडगे, तसेच पुतण्या श्री. गणेशजी खांडगे, व सूनबाई खांडगे, सौ. अनुपमा खांडगे यांनी त्यांना भरपूर पाठबळ दिले आहे.सतर्क महाराष्ट्च्या संपादिका रेखा भेगडे यांच्या वतीने आईसाहेब सुलोचना खांडगे यांचे अभिनंदन!