मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यावर मावळ भाजपाच्या वतीने आनंदोउत्सव साजरा
वडगाव मावळ :-
महाराष्ट्र भाजपा वतीने विधिमंडळ गटनेते म्हणून पक्षाचेवतीने देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाची घोषणा जाहीर झालेबद्दल,मावळ तालुका भाजपाच्यावतीने वडगाव मध्ये फटाके वाजवून व पेढे वाटून आनंदउत्सव साजरा करण्यात आला, यावेळी मावळ तालुका भाजपा सरचिटणीस अभिमन्यू शिंदे, सोशल मीडिया प्रमुख अनंता कुडे,वडगांव शहर भाजपा अध्यक्ष संभाजी म्हाळसकर, श्री पोटोबा देवस्थान चे अध्यक्ष किरण भिलारे, मा सरचिटणीस सुनिल चव्हाण, युवक अध्यक्ष अतिश ढोरे,अमोल धिडे, मा. ता.खरेदी विक्री संघांचे मा. संचालक मधुकर जगताप,मा.नगरसेवक ऍड विजयराव जाधव,शामराव ढोरे, कुलदीप ढोरे,अमोल पगडे, विठ्ठल तुर्डे,संतोष भालेराव,श्रीकांत चांदेकर, रामदास बोऱ्हाडे आदिसह भाजपा चे कार्यकर्ते उपस्थित होते.