आळंदी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता मोहिमेस गती अलंकापुरी सुनीसुनी आळंदीतील भाविकांचा नामगजर पालखी महामार्गावर

SHARE NOW

आळंदी ( प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वैभवी पायी वारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान नंतर आषाढी वारीस राज्य परिसरातून आलेल्या भाविक,वारकऱ्यांच्या दिंड्यांनी हरिनाम गजरात पंढरीचे दिशेने पायी वारीत प्रवास सुरु केला असून आळंदीतील भाविकांचा नाम गजर आता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर होऊ लागला आहे. मात्र आता आळंदी परिसर सुनासुना दिसू लागला असून भाविकांचा सुरु असलेला नामगजर कमी झाला आहे. आळंदी नगरपरिषदेने शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम सुरु केली असून गजबजलेली आळंदी आता मात्र सुनीसुनी दिसत आहे.

आळंदीला आलेले आषाढी महायात्रेचे तसेच इब्द्रायणी नदी ला आलेले महापुराची रूप भाविकांनी अनुभवले. आपली आषाढी वारीची सेवा श्रींचे चरणी अर्पण करण्यास दिंड्या दिंड्यातून तसेच खाजगी व सार्वजनिक प्रवासी वाहनाचे मदतीने वारी सुरु केली आहे. दरम्यान आळंदी माऊलींचे प्रस्थान नंतर आळंदी नगरपरिषदेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहिमेस गती देण्यात आली असल्यावही माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.

चकाचक तीर्थक्षेत्र आळंदीला वेध स्वच्छतेचे

आळंदीतील गर्दी कमी झाल्याने नगरपरिषदेने शहरात धुरीकरण,औषध फवारणी आणि ठिकठिकाणी कचरा उचलण्याची मोहीम तीव्र गतीने सुरु केली आहे. अतिरिक्त कामगार व वाहन व्यवस्था करीत शहर कचरा मुक्त करण्याचे कामास प्राधान्य दिल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले. उर्वरित साफ सफाई तसेच यात्रा कालावधीतील साचलेला धर्मशाळां मधील कचरा, सिध्दबेटातील कचरा, पाणी पुरवठा केंद्राचे परिसरातील कचरा, इंद्रायणी नदी नदी घाटावरील,वर्दळीचे ठिकाणाचा तसेच रस्त्यांचे कडेला असलेला कचरा उचलण्यास घंटागाडयांना जास्तीचे खेपा करण्यास सांगितल्याचे मुकादम मालन पाटोळे यांनी सांगितले.

Advertisement

आळंदी नगरपरिषदेने शहरातील उर्वरित स्वच्छतेचे काम सुरु करून चकाचक आळंदी मोहिमेला गती दिली आहे. यासाठी शहरातील सफाई कामगार महिला, पुरुषांचे हातही स्वच्छतेच्या कामास सरसावले आहेत. आळंदीतील स्वच्छता येत्या दोन दिवसांत पूर्ण होऊन पूर्व पदावर काम येईल असे त्यांनी सांगितले. नदी घाटाचे दुतर्फा स्वच्छता करीत धुरीकरणास गती देण्यात येत आहे. गर्दीमुळे घंटागाड्या काही ठिकाणी पोहचल्या नसल्याने राहिलेला कचरा उचलेण्यास आता प्राधान्य देण्याचे सूचना दिल्या आहेत. प्रस्थान काळात मोठ्या प्रमाणात अनेक टन कचरा उचलला असून उर्वरित साफ सफाईचे काम अधिक गतीने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

भाविकांच्या गर्दीने व नामगजराने फुललेले रस्त्यावरील गर्दी ओसरली आहे. यात्रेतील टाळ,विना मृदंगाचा त्रिनाद आणि ज्ञानोबा- माउली-तुकारामचा जयघोष कमी झाला आहे. मठ,मंदिरे व धर्मशाळा तसेच मोकळ्या जागेतील वर्दळ कमी झाल्याने आळंदी सुनीसुनी वाटू लागली आहे. अनेक भाविकांनी माऊलींच्या चरणी आषाढी वारी रुजू करण्यास आळंदीतून प्रस्थान करीत वारीची सेवा रुजू करीत पंढरीची वाट धरली आहे. इंद्रायणीच्या दुतर्फा घाटावर भाविकांची गर्दी लक्षणीय कमी झाली आहे. इंद्रायणी नदीला वारी पूर्व मोठ्या प्रमाणात सर्वत्र पाऊस झाल्याने महापूर आला होता. या महापुराची पाणी ओसरू लागले असून महापुराची पाण्यात वाहून आलेली जलपर्णी अनेक ठिकाणी अडकून पडली आहे. जलपर्णी काढण्याचे काम देखील सुरु करण्यात येत आहे. भक्ती सोपान पुलाला अडकलेली जलपर्णी आणि मांडवाची साहित्य देखील काढण्यासाठी संबंधित प्रशासनास सूचना करण्यात आल्या आहेत. पाऊस कमी झाल्याने इंद्रायणी नदीतील महापुराची पाण्याचा प्रवाह देखील कमी झाला आहे. नदीत पाणी असल्याने तीर्थक्षेत्रातील स्नान माहात्म्य जोपासत स्नानास भाविकांनी गर्दी केली होती. ती हि आता फारच कमी झाली आहे. नदी घाटावर आता भाविकांची लगबग कमी झाली असून ठिकठिकाणचे धर्मशाळां मध्ये, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page