*सरस्वती विद्या मंदिर, इंदोरी शाळेत नूतन वास्तुपूजन व उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न*
इंदोरी :
सरस्वती शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सरस्वती विद्यामंदिर इंदोरी या शाळेच्या नवीन वास्तूचे शनिवार दिनांक १४/०६/२०२५ रोजी वास्तुपूजन, उद्घाटन व सत्यनारायण महापूजा उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमासाठी मा. जि. प. सदस्य मा. श्री.प्रशांतजी ढोरे, मा. सभापती मा. श्री. विठ्ठलरावजी शिंदे, इंदोरी गावचे सरपंच मा. श्री. शशिकांत शिंदे, मा. सरपंच मा.श्री. दामोदर शिंदे, इंदोरी गावचे ग्रामसेवक मा. श्री. हुलगे भाऊसाहेब, इंदोरी गावच्या उपसरपंच मा. सौ. बेबीताई बैकर, ग्रामपंचायत सदस्या मा. सौ. सुरेखाताई शेवकर, मा. प्रशांत भागवत ,मा. सौ. सपनाताई चव्हाण, मा. सौ. लतिकाताई शेवकर, मा. सौ. धनश्रीताई काशीद, इंदोरी गावचे ग्रामस्थ ,सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुरेश झेंड, उपाध्यक्ष मा. श्री. दिलीप कुलकर्णी, खजिनदार मा. सौ. सुचित्राताई चौधरी, अंमलबजावणी अधिकारी मा. श्री. अनंत भोपळे, शालेय शिक्षण समिती सदस्या मा. डॉ. सौ. ज्योतीताई चोळकर, कार्यवाह मा. श्री. प्रमोद देशक, सदस्य मा. श्री. विश्वास देशपांडे, तळेगाव शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. श्री. नवनाथ गाढवे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. रेखा परदेशी, बालवाडी विभाग प्रमुख मा. सौ. सोनाली काशीद इंदोरी शाळेच्या मा. मुख्याध्यापिका मा. सौ. नीता दहीतुले, मा. बालवाडी विभाग प्रमुख मा. सौ. विजया इनामदार, मा. सौ. अनघा बुरसे तळेगाव शाळेचे बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
नवीन वास्तूचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व नवीन वास्तुपूजनाचे निमित्ताने सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते .सत्यनारायण महापूजा शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. नितीन शिंदे व मा. सौ. स्वाती शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली.
बालवाडी प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. नितीन शिंदे सर व बालवाडी विभाग प्रमुख मा. सौ. अर्चना एरंडे तसेच शाळेच्या मा. बालवाडी विभाग प्रमुख मा. सौ. अनुराधा बेळणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात पार पडला.