*विवेकानंद इंग्लिश स्कूल केंधळी (मंठा) येथील विद्यार्थ्यांनी केले यशस्वीरीत्या रॉकेट लॉन्चिंग…*
मंठा येथील विद्यार्थी महेश वायाळ व पूजा वायाळ या भावा-बहिणीने पर्यावरणास अनुकूल असे यशस्वीरित्या रॉकेट प्रक्षेपण तयार केले. भारतीय अंतराळ संस्था इस्रोच्या अंतर्गत चालणारी संस्था (आय.डी.वाय.एम) अर्थातच इग्नाइटिंग ड्रीम्स ऑफ यंग माईंड्स फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हे रॉकेट बनवण्यात आले असून, महेश व पूजा यांना रविशंकर कुमार यांनी मार्गदर्शन करून, त्यांचे कौतुक केले आहे.
*यावेळी पूजा वायाळ हिने सांगितले की, लहानपणी या सर्व गोष्टी मी टीव्ही व मोबाईलवर बघायचे. ते पहात असताना स्वप्न होते की, एक दिवस आपणही भारत देशासाठी रॉकेट लॉन्च करावे. ते स्वप्न आज पूर्ण झाले. रॉकेट बनवताना विशेष काळजी घेतली की, कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही किंवा जीवित हानी होणार नाही म्हणून, पोटॅशियम नायट्रेट आणि शुगर फ्लूचा वापर करून, हे रॉकेट बनवले भारतीय युवा पिढीने देखील असे नाविन्यपूर्ण काम करून, विकसित भारत मध्ये आपल्या माननीय पंतप्रधान यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुमूल्य योगदान द्यावे. असे या दरम्यान नमूद करण्यात आले.*
*विवेकानंद स्कूलच्या मैदानावर झालेल्या या अभूतपूर्व* *कार्यक्रमादरम्यान प्रमुख आकर्षण ठरले ते शाळेचे अध्यक्ष आदरणीय श्री संदीप दादा बाहेकर व शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती रश्मी यादव मॅडम यांची प्रमुख उपस्थिती…. तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी देखील या कार्यक्रमाला उपस्थितीत राहून, त्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी कार्यक्रमाला दिला. या दरम्यान शाळेचे अध्यक्ष श्री.संदीप दादा बाहेकर यांच्या हस्ते रॉकेट लॉंच करण्यात आले.त्यावेळी सर्वांचे लक्ष अवकाशाकडे वेधले गेले.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महेश वायाळ व पूजा वायाळ या बहिण- भावांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. तसेच पंचक्रोशीत या बहीण-भावाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.