*सरस्वती विद्या मंदिर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठया उत्साहात साजरा*
तळेगाव दाभाडे :
सरस्वती शिक्षण संस्थेचे, सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे येथे शनिवार दिनांक २१/०६/२०२५ रोजी योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
योगासन भारताचा पारंपरिक व्यायाम प्रकार असून आंतरिक व बाह्य शरीर निरोगी ठेवण्याचा मार्ग आहे.असे योग दिनाचे महत्त्व सहशिक्षिका सौ.सोनल शेटे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
इ.४ थी ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार , पद्मासन , ताडासन वृक्षासन ,भद्रासन, शशांकासन इत्यादी योगासने केली .
आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगासने किती महत्त्वाचे आहेत, यासंदर्भात विषय तज्ज्ञ पंचायत समिती वडगाव मावळ सौ. ज्योती लावरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सोनल शेटे यांनी तर आभार प्रदर्शन प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.नवनाथ गाढवे सर यांनी केले.
सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सुरेश झेंड , उपाध्यक्ष मा. श्री .दिलीप कुलकर्णी, कार्यवाह श्री.प्रमोद देशक, शालेय शिक्षण समिती सदस्य डॉ.सौ.ज्योती ताई चोळकर ,सदस्य श्री.विश्वास देशपांडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.