“वडगाव नगरपंचायत प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात ग्रामस्थांचं महादेव मंदिरात दुग्धाभिषेक आंदोलन “
वडगाव मावळ:
दि-२१ सध्या राज्यामध्ये मान्सून पावसाचे जोरदार आगमन झाले असून पहिल्याच पावसात वडगाव नगरपंचायत कडून करण्यात येणाऱ्या नालेसफाई कामांची चांगलीच पोलखोल झाली मान्सून दाखल होण्यापूर्वी करण्यात येणारी नाले- ओढ्यांची सफाईची कामे ही वडगाव नगरपंचायत प्रशासनाने वेळेत पूर्ण न केल्यामुळे गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने वडगाव मुख्य बाजारपेठेत काहीशी पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाली होती शहराच्या मधोमधुन वाहणाऱ्या देव ओढ्याला पावसाच्या पाण्याने अगदी नदीचे स्वरूप आल्याचे दृश्य तयार झाले होते ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरा समोरून वाहणाऱ्या ओढ्याची नालेसफाई न झाल्याने पाण्याच्या मार्गामध्ये मोठा कचरा साठून दूषित पाणी व माती रस्त्यावरून ओसंडून वाहात बाजूला असणाऱ्या महादेव मंदिरात शिरल्याने मंदिर व पिंड पुर्णतः प्रदुषित व अपवित्र झाल्याने तसेच नगरपंचायत प्रशासनाने याची कोणतीही दखल गांभीर्याने न घेतल्याने मा.उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली आज ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या वतीने शंभू महादेव पिंडीला विधीवत दुग्धाभिषेक घालून पिंड व मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले व या घटनेला जबाबदार असणाऱ्या वडगाव नगरपंचायतच्या विरोधात ग्रामस्थांकडून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मनसे नेते रुपेश म्हाळसकर,पोटोबा देवस्थान विश्वस्त अनंता कुडे,श.प राष्ट्रवादी पक्ष तालुका अध्यक्ष विशाल वहिले, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अतुल राऊत,सुनील शिंदे, मनसे नेते तानाजी तोडकर,मनसे वडगाव शहराध्यक्ष मच्छिंद्र मोहिते,संतोष म्हाळसकर, शिवसेना नेते बाळासाहेब शिंदे,नितीन चव्हाण, आशिष म्हाळसकर,महेंद्र शिंदे, करण शिंदे,आदित्य म्हाळसकर प्रणव म्हाळसकर,विकास साबळे,आकाश वारिंगे, रोहित कोळी,विजय पाटील, अजिंक्य शिंदे, सुरेश धनवडे, रेणुका म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर,मंदा म्हाळसकर,वंदना म्हाळसकर, अनुपमा शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.