धनश्री दिवाळी अंकाचे मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते प्रकाशन
पिंपरी :
शब्द पब्लिसिटी निर्मित धनश्री दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्यांच्या आयुष्यावर चंदू चॅम्पियन सिनेमा बनला, असे पदमश्री,अर्जु्न जीवन गौरव पुरस्कार विजेते, प्रथम पॅराऑलिम्पिक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते थेरगाव येथे करण्यात आले.
यावेळी पेटकर यांचे सुपुत्र अर्जुन पेटकर, दिवाळी अंकाचे संपादक शिवाजी घोडे उपस्थित होते.
या अंकात बाबा भांड यांचा सयाजी महाराजांचे स्त्री विषयक कार्य हा लेख लक्षवेधी आहे. श्रीकांत चागुले, भारती सावंत, दीपक शिकारपूर, अण्णा धगाटे, डॉ अनिल कुलकर्णी, डॉ शीतल मालुसरे,डॉ नीरज व्यवहारे, गजानन मोघे, डॉ बबन डोळस, गौरी कुलकर्णी यांचे लेख आहे. सपना पवार यांचे भविष्य तर गुरु प्रसाद पंदूरकर यांचे शब्दकोडे आहे. अशा विविध साहित्यानी नटलेला अंक आहे. अंकाचे यंदा ११ वे वर्ष आहे.अशी माहिती संपादक घोडे यांनी यावेळी दिली. यावेळी पद्मश्री पेटकर यांनी वाचनाचे महत्व सांगितले. आणि अर्जुन पेटकर यांनी वडिलांचा जीवन प्रवास कथन केला.






