बिहार निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय; देहूरोडमध्ये जल्लोषाचा माहोल
देहूरोड: बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या घवघवीत विजयाचा जल्लोष देहूरोड परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बिहारमध्ये जनतेने नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमताचा कौल दिल्याचे निकाल जाहीर होताच स्पष्ट झाले. भाजपाने तब्बल ८९ जागांवर विजय मिळवत मोठे यश संपादन केले.
या विजयानिमित्त देहूरोडमधील भाजप कार्यकर्त्यांनी विकासनगरमधील गणेश चौकात, तसेच देहूरोड बाजारपेठेतील सुभाष चौकात, फटाक्यांची आतषबाजी करत आणि लाडू वाटत जल्लोष साजरा केला. “भारतीय जनता पार्टीचा विजय!” अशा घोषणा देत परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमात दिलीप राऊत, जया राऊत, धर्मपाल तंतरपाळे, सुधीर साळुंखे, मोहन राऊत, बाळा झंझाड, उमेश सांडभोर, मारुती पवार, शिल्पा राऊत, वैशाली वाघचौरे, सिंधू तंतरपाळे, रोहन राऊत, माधुरी सावळे, उपाध्यक्ष चंद्रिका कनक, शैलाज खान, सविता शिवले यांसह अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
दरम्यान, सुभाष चौक परिसरातही भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, लाडूंचे वाटप आणि एकमेकांना लाडू चारत विजयाचा उत्सव साजरा केला. या ठिकाणी रघुवीर शेलार, बाळासाहेब शेलार, संजय पिंजण, महावीर बरलोटा यांसह महिला कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.
देहूरोड परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.






