जिजाऊ महिला कापड पिशवी गृह उद्योगाचे उद्घाटन.
पिंपरी चिंचवड :
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला वाल्हेकर वाडी चिंचवड येथील जिजाऊ सोशल फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत प्लास्टिक प्रदूषण टाळण्यासाठी जिजाऊ महिला कापड पिशवी गृह उद्योगाचे उद्घाटन पीसीएमसी च्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा डांगे यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉक्टर डांगे यांनी कापडी पिशवी मुळे प्लास्टिक वापर कमी होऊन महिलांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याने महिला सबल आणि सक्षम होऊ शकतात. तसेच पर्यावरणाचे रक्षण ही होऊ शकते असे मौलिक विचार मांडले. तसेच पिंपरी चिंचवड शिवसेनेच्या शहराध्यक्षा अनिताताई तुतारे यांनी स्वानुभवातून महिला एकजुटीने कशा यशस्वी होऊ शकतात हे सांगताना या उद्योगासाठी शुभेच्छा दिल्या.
कापडी पिशवी उद्योग निर्माण करण्यासाठी या भागातील वीस बचत गटांनी सहभाग नोंदवलेला आहे. यापूर्वीच काही बचत गटांनी काम सुरू करून जवळपास हजार पिशव्या तयार केलेल्या आहेत. या कामी फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती भालके यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. संदीप भालके यांनी त्यांना साथ दिली आहे.
सदर कार्यक्रमाला पीसीएमसी स्कूल वाल्हेकर वाडीच्या मुख्याध्यापिका रोहिणी जोशी, सांगवी भागात बचत गटाचे काम करणाऱ्या आणि वस्ती शाळा मुलांना शिक्षण देण्यात अग्रेसर असणाऱ्या आदिती निकम, रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका एडवोकेट वर्षा टेमगिरे, डॉक्टर चेतना भोर, राष्ट्रवादी शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर, मस्ती की पाठशाला च्या संस्थापक प्राजक्ता रुद्रवार, केतकी नायडू, सौ भंडारे, रोटरी इलाईट पिंपरी चे माझी प्रेसिडेंट श्री व सौ अनिल नेवाळे, ट्रान्सजेंडर अमित मोहिते, संवाद व्यासपीठाचे हरीश अप्पा मोरे, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी चे अध्यक्ष रोटरीयन सुधीर मरळ, सेक्रेटरी रोटरीयन रामेश्वर पवार, प्रणाली हरपुडे, स्वाती वाल्हेकर, अश्विनी खोले, सौ. शेळके, नीलम चिंचवडे आणि सर्व रोटरी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा बोरा यांनी केले आणि विजयादेवी जगदाळे यांनी सर्वांचे आभार मानले.