# ज्येष्ठ नाट्य अभिनेते सुरेश साखवळकर व ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार#
तळेगाव दाभाडे:
तळेगाव शहरातील साप्ताहिक अंबर वृत्तपत्राचे मुख्य संपादक. ज्येष्ठ नाट्य अभिनेते.सुरेश साखवळकर व ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने शनिवार दिनांक १४जुन २०२५ रोजी दुपारी चार वाजता हा जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात हा पुरस्कार सोहळा पार पडणार असून. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा होणार आहे. यावेळी उद्योग मंत्री व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे आजीवन विश्वस्त शशी प्रभू. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद चे विश्वस्त मोहन जोशी. अशोक हांडे आदी मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे. सुरेश साखवळकर गेल्या पन्नास वर्षापासून मराठी रंगभूमीची सेवा करत आहे त्यांच्या या कार्याचा सन्मान व्हावा म्हणून त्यांना व निना कुलकर्णी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. प्रतिवर्षी ज्येष्ठ नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिना निमित्त रंगकर्मींना उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. या कार्यक्रम सोहळ्या दरम्यान गोविंदयान. संगीत शारदा. संगीत संशय कल्लोळ. संगीत मृच्छाकटिक. या नाटकातील प्रवेशाचे सादरीकरण होणार आहे. सुरेश साखवळकर यांना मानाचा समजला जाणारा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.






