# तळेगावातील विठ्ठल मंदिरात गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे#
तळेगाव दाभाडे:
तळेगाव शहरातील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरामध्ये मंदिर संस्थांच्या वतीने श्री गुरु दादा महाराज साखरे यांच्या ८५ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त ८ जून २०२५ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त पंचम वेद श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण. हरिभक्त परायण नथुराम जगताप पाटील. त्यांच्या नेतृत्वात होत असून. दररोज पहाटे महापूजा, काकड आरती. पारायण सोहळा. चरित्र कथा. हरिपाठ. किर्तन. जागर आदी कार्यक्रम होणार आहेत. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची जीवन चरित्र कथा. हरिभक्त परायण प्रकाश महाराज शिंदे. हे कथन करणार आहेत. या सप्ताहात हरिभक्त परायण यतीराज महाराज लोहोर. हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज थोरात. हरिभक्त परायण तुषार महाराज दळवी. हरिभक्त परायण गणेश महाराज फरताळे. हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज जोशी. हरिभक्त परायण सच्चिदानंद महाराज कांबेकर. हरिभक्त परायण डॉ यशोधन किसन महाराज साखरे. यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या सप्ताहात ज्ञानदान सेवा अशोक भेगडे. विजय सुतार.डाॅ अनिश भट. गोकुळ किरवे. मोहन जाधव. राजन गुंड. रोहित गुंड. भागीरथीबाई गुंड. समस्त गुंड परिवार व विश्वस्त संस्था त्यांच्याकडून पुरवली जाणार आहे.तर प्रशांत दाभाडे. कैलास खांडभोर. वैभव कोतुळकर. आनंद रिकामे. विक्रम बुट्टे पाटील. द्वारकानाथ थोरात आदी कडुन अन्नदान सेवा पुरवली जाणार आहे.