नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्रा. शंकरराव उगले यांना डॉक्टरेट
तळेगाव दाभाडे: नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्रा. शंकरराव उगले यांनी डॉक्टरेट मिळवली. प्रा. उगले यांना गणित विषयात पीएच डी पदवी मिळाली आहे.नूतन परिवारात त्यांचे अभिनंदन होत आहे. मागील वर्षी उगले महाराष्ट्र शासनाची गणित विषयाची सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. त्यांनी राजस्थान येथील जे जे टी विद्यापिठात गणित विषयात ग्राफ सिद्धांतातील ऑप्टिमायझेशन, ट्री ट्रॅव्हर्सल आणि काही प्रकारच्या अल्गोरिदमचा अभ्यास यावर प्रबंध सादर केला .
नगर जिल्ह्यातील डोंगरगाव गावचे ते सुपुत्र आहेत.नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे .अतिशय प्रतिकूल परिस्थित शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केले . प्राथमिक शिक्षण डोंगरगाव येथे झाले .माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल हिवरगाव आंब्रे येथे उच्च माध्यमिक शिक्षण नूतन जुनिअर कॉलेज, राजापूर , पदवी शिक्षण संगमनेर कॉलेज संगमनेर येथे व पदव्युत्तर शिक्षण न्यू आर्टस् कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगर येथे झाले.
अनेक विद्यार्थ्यांच्या मनात गणित या विषयाची भीती असते. गणित हा विषय अगदी सोप्या पद्धतीने शिकवून विद्यार्थ्यांमध्ये त्याची आवड निर्माण होईल आणि विद्यार्थी कशाप्रकारे जास्त गुण प्राप्त करतील याचा कायम प्रयत्न असेल असा मानस उगले यांनी बोलताना व्यक्त केले
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय भेगडे ,उपाध्यक्ष गणेश खांडगे ,सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार तसेच अभियांत्रिकी कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के कार्यकारी संचालक डॉ.गिरीश देसाई सीईओ डॉ .रामचंद्र जहागीरदार प्रा. डॉ. एस.एन.सपली यांनी डॉ. प्रा. शंकरराव उगले यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.