पक्का वाहन परवानासाठी वडगाव,लोणावळा,खेड,मंचर,जुन्नर येथे आरटीओ चा परवाना शिबिर दौरा
वडगाव:
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाकडून( आरटीओ) नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने वडगाव. लोणावळा. खेड. मंचर. जुन्नर. येथे पक्का वाहन परवाना शिबिर दौरे आयोजित केले असून वाहनचालकांनी त्यामध्ये निश्चित केलेल्या दिवशी उपस्थित पक्का वाहन परवाना घ्यावा असे आवाहन आरटीओ कडून करण्यात आले आहे. वडगाव मावळ येथे २३आणि २४जून २०२५ रोजी. लोणावळा येथे २६आणि २७जून रोजी. खेड येथे २ आणि ३जून रोजी. मंचर येथे ९आणि १०.जून रोजी. तर जुन्नर येथे १६ १७.१८.जून रोजी शिबिर दौरा होणार आहे. या दौऱ्यामध्ये पक्का वाहन परवाना चाचणी.१५ वर्षापेक्षा जुन्या वाहनांच्या नोंदणी नूतनीकरणाचे कामकाज केले जाणार आहे. या दौऱ्याच्या दिवशी जर शासकीय सुट्टी असेल तर शिबिराचा कार्यक्रम जाहीर केलेल्या अगोदरच्या किंवा नंतरच्या दिवशी घेण्यात येईल असे देखील आरटीओ कडून कळवण्यात आले आहे.