*तळेगाव येथे समर्थ विद्यालयात कार्तिकी एकादशी सोहळा साजरा*
तळेगाव दाभाडे येथील नवीन समर्थ विद्यालयात मंगळवारी(दि.२६)
कार्तिकी एकादशी निमित्त सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे होते. कार्यक्रमास मुख्याध्यापिका वासंती काळोखे पर्यवेक्षक शरद जांभळे शिक्षक प्रतिनिधी योगेश पाटील शिक्षक सुनिल बोरुडे संजय कसाबी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पालखीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सृष्टी कवडे आणि संचाली शिरसाट या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक युवराज रोंगटे यांनी केले इ. ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांनी अभंगाचे गायन केले व स्वरांजली दिंडोरे या विद्यार्थिनीने कीर्तन व निरूपण केले. आर्यन या विद्यार्थ्याने अभंगाचे गायन केले. वासंती काळोखे यांनी कार्तिकी एकादशीचे महत्व सांगितले. यानंतर माऊलींची पालखी घेऊन सर्व मुलांनी शाळेच्या सभोवतालच्या परिसरात पालखीसह दिंडी सोहळ्याची मिरवणूक काढली. शाळेतल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाई, निवृत्ती महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान महाराज व मुक्ताबाई यांची वेशभूषा केली होती.
दिंडी सोहळा संपन्न झाल्यानंतर शाळेच्या प्रांगणामध्ये विठ्ठल रखुमाई आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. प्रसादाचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे आयोजन बापूसाहेब पवार, युवराज रोंगटे , प्रशांत नरवटे यांनी केले.