ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी नामदास महाराज यांचे श्रींचे सोहळ्यात हृदयस्पर्शी कीर्तन

आळंदी  :

आळंदी मंदिरात माऊली माऊली नामजयघोषात कीर्तन सेवा, पुष्पवृष्टी आणि घंटानाद, श्रींची आभूषणांसह सजलेल्या पूजेतील लक्षवेधी वैभवी रूप दर्शन, तसेच परंपरेने पहाट पूजा करून श्रींचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा प्रथा परंपरांचे पालन करीत नामजयघोषात लाखो भाविकांचे उपस्थितीत परंपरेने साजरा झाला. यावेळी ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली.

या वर्षी सोहळयास माजी मंत्री, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार विजय शिवतारे, खासदार संजय उर्फ बंडू जाधव, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विधितज्ञ ॲड.राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पंढरपूर देवस्थान विश्वस्त ॲड. माधवीताई निगडे, देहू देवस्थान अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, रवींद्र महाराज हरणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, राजाभाऊ चौधरी, स्वामी सुभाष महाराज, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, राजाभाऊ चोपदार, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, चैतन्य महाराज कबीरबुवा, मानकरी साहिल कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष मानकरी राहुल चिताळकर, माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, स्वप्नील कुऱ्हाडे, मंगेश आरु, माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, राम गावडे, माजी नगराध्यक्ष रोहीदास तापकीर, संजय घुंडरे, अजित वडगावकर, राहुल चव्हाण, वैजयंता कांबळे, पुष्पा कुऱ्हाडे, सागर रानवडे, महेश कुऱ्हाडे, अमोल घुंडरे, अमोल वीरकर, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सागर कुऱ्हाडे, संतोष भोसले, विष्णू वाघमारे, विलास तात्या बालवाडकर, वारकरी भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.

माऊलींचे मंदिरात सोहळ्यातील परंपरेने पहाटे विधीतज्ञ प्रमुख विश्‍वस्त राजेंद्र उमाप यांच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक पूजा झाली. सोहळ्यातील परंपरेने हैबतबाबा पायरीपुढे हैबतबाबा आरफळकर यांच्या वतीने कीर्तन सेवा झाली. श्रींचे संजीवन समाधी दिन प्रसंगावर आधारित सोहळ्या निमित्त संत नामदेव महाराजांचे १६ वे वंशज माधव महाराज नामदास यांचे ह्रदय स्पर्शी वाणी तुन श्रींचे संजीवन समाधी दिन प्रसंगावर आधारित प्रभावी कीर्तन सेवा रुजू झाली. यावेळी संत नामदेव महाराज यांचे १६ वे, १७ वे आणि १८ वे वंशज नामदास परिवार उपस्थित होते.

सोहळ्यातील कीर्तन प्रसंगी माधव नामदास महाराज यांनी श्रीक्षेत्र अलंकापुरीचे माहात्म्य विषद केले. यासह श्रींचे चरित्र, समाधी सोहळ्याचे प्रसंग आदी वर भाष्य करीत सोहळ्यात हृदयस्पर्शी कीर्तन सेवा केली. यावेळी अनेक भाविकांच्या डोळ्यांचे कडा पाणवल्या.

आळंदी मंदिरात समाधी दिन सोहळ्यास आकर्षक रांगोळी, फुलांची आकर्षक सजावट लक्षवेधी ठरली. लांडीकार्तिकी यंत्रे निमित्त मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त होता. कार्तिकी यात्रा कालावधीत श्रींचा अभिषेक, आरती, महानैवेद्य असे नित्योपचार पूजा या काळात सोडून भाविकांसाठी दर्शन खुले राहिले. कमी वेळेत जास्त भाविकांना दर्शन व्यवस्थेत देवस्थान चे कर्मचारी व्यवस्थापन यांनी विशेष परिश्रम घेतले. यामुळे लाखो भाविकांना दर्शन सुलभ रित्या घेता आले. अनेक भाविकांनी मंदिर प्रदक्षिणा करीत महाद्वारातून श्रींचे दर्शन घेत मंदिर कलश दर्शन घेत आपली वारी पूर्ण केली.

Advertisement

माजी पालक मंत्री आमदार भाजपचे नेते चंद्रकांत पाटील संजीवन सोहळ्या पूर्वी मोठ्या ताफ्यात येत श्रींचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात ताफयातील वाहने आल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. श्रींचे ७२९ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यात आमदार चंद्रकांत पाटील यांनी श्रींचे दर्शन घेतल्या नंतर त्यांचे हस्ते भाविकांना महाप्रसादाचे वाटप उत्साहात सुरु झाले. यावेळी आळंदी संस्थांनचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांचे हस्ते पाटील यांचा शाल, हार, श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थांचे मुख्य व्यवस्थापक माऊली वीर, किसान मोर्चार्चे संजय घुंडरे, संकेत महाराज वाघमारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी विश्वस्त भावार्थ देखणे यांचे समवेत संवाद साधला. येथील समस्यां, अडचणी जाणून घेतल्या. देवस्थानचे नियोजित प्रकल्पाची माहिती घेत देवस्थानचे समस्यां, अडचणी आणि नियोजित प्रकल्पास यापुढील काळात मदत सहकार्य केले जाईल असे आमदार पाटील यांनी सांगत ग्वाही दिली. देवस्थानचे विकास कामासाठीचे अनुषंगाने बैठक घेतली जाईल असे सांगत संवाद साधला. श्रींचे संजीवन समाधी दिनी गुरुवार असल्याने परंपरेने गुरुवारची पालखी मंदिर प्रदक्षिणा होणार आहे.

उद्या शुक्रवारी ( दि. २९ ) मंदिरात श्रींना पवमान पूजा, महापूजा अभिषेक, महानैवेद्य, कीर्तनसेवा, धुपारती आळंदी देवस्थान यांचे वतीनेहोईल. सोपानकाका देहूकर यांचे तर्फे कीर्तन सेवा वीणा मंडपात होणार असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. त्यानंतर धुपारती होणार आहे.

आळंदी मंदिरात संजीवन समाधी दिनी परिमंडळ ३ चे सहाय्यक पोलीस आयुका डॉ. शिवाजी पवार, राजेंद्र गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुतीश नांदुरकर, बापू ढेरे, पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे, दत्त जाधव, राहुल काळे आदींनी बंदोबस्तासाठी मंदिरात नियोजन केले.

आळंदी देवस्थानला पिकअप वाहन भेट

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीस पिक अप व्हॅन पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष विलास तात्या बालवडकर यांनी उपलब्ध करून देऊन या पिकअप व्हॅनचे लोकार्पण श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कडे चावी सुपूर्द करून करण्यात आले. यावेळी पूजा, वाहनास पुष्पहार घालून वाहन सुरु करण्यात आले. यावेळी श्री ज्ञानेश्वर संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, पंढरपूर मंदिरे देवस्थानचे विश्वस्त माधवी निगडे, व्यवस्थापक माऊली वीर, उमेश महाराज बागडे, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते. श्री ज्ञानेश्वर संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप यांनी नवीन वाहन चालवीत वाहनाचे सारथ्य केले.

पहिल्या सार्थ इंग्रजी ज्ञानेश्वरी चे प्रकाशन

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानंतर पहिल्या सार्थ इंग्रजी ज्ञानेश्वरी चे प्रकाशन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ साहेब, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, कबीर मठाचे प्रमुख चैतन्य महाराज लोंढे कबीर बुवा, खासदार संजय उर्फ बंडू जाधव आदी मान्यवरांचे उपस्थितीत झाले. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक राम गावडे आध्यात्मिक आघाडीचे संजय घुंडरे पाटील, किरण गवारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ. सुरेंद्र सूर्यवंशी, तुकाराम बुवा गरुड ठाकूर दैठणकर, मीरा तुकाराम गोरडे ( सूर्यवंशी ) यांनी सार्थ इंग्रजी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले. यावेळी विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांनी उपक्रमाचे कौतुक करून संत साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी उपयुक्त प्रकाशन ठरेल असे सांगितले. तत्पूर्वी श्री ज्ञानेश्वरी हिंदी अनुवाद देखील प्रकाशित असल्याचे संयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page