वडगाव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बालदिन साजरा
वडगाव
वडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्या मंदिर येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. नंदकुमार खाडे अध्यक्षस्थानी होते. पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. इयत्ता १ ते ४ च्या विद्यार्थ्यांनी नेहरूजींच्या कार्यावर सुंदर भाषणं सादर केली.
मुख्याध्यापक श्री. खाडे यांनी नेहरूजींच्या कार्याची माहिती देत विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षिका सौ. स्वाती खुडे यांनीही भाषणातून मुलांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक श्री. किरण नवले, निलेश गवई, सौ. सारिका अवचरे, सौ. कीर्ती वहिले, सौ. सुमन दळवी, सौ. काळढोके, सौ. नांगरे, श्री. गजभिव, सौ. रेशमा गायकवाड, सौ. रीमा शिंदे यांनी मेहनत घेतली.
प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. किरण नवले यांनी केले.






