माईर एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात वार्षिक मॉडेल युनायटेड नेशन्स परिषदेचे आयोजन

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

माईर एमआयटी पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात वार्षिक मॉडेल युनायटेड नेशन्स परिषद दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ आयोजित करण्यात आली होती. सदर परिषद संस्थेच्या अकॅडमीक क्लब इंजेनियमने शिक्षक समन्वयक म्हणून डॉ. सुषमा शर्मा, डॉ कोमोलिका रॉय प्राध्यापक यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती.

इंजेनियम नियमित पणे क्विज, बुक क्लब मीटिंग्स, ट्रेझर हन्ट्स, वादविवाद आणि इतर विध्यार्थी केंद्रित उपक्रम आयोजित करते जे विध्यार्थ्यांना सार्वजनिक बोलण्याची कौशल्य विकसित करण्यास आणि त्यांची गंभीर विचारसरणी सुधारण्यास मदत करतात.

मॉडेल युनायटेड नेशन्स हे प्रत्यक्ष युनायटेड नेशन्स समितीच्या कार्यवाहीचे अनुकरण आहे जिथे विद्यार्थी संयुक्त राष्ट्राशी संलग्न देशांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. एमयूएन परिषद विद्यार्थ्यांना जागतिक घडामोडींमध्ये त्यांची भूमिका आणि मुत्सद्देगिरी बद्दल जाणून घेण्यास मदत करते. ते विद्यार्थ्यांना सार्वजनिक बोलणे, लेखन आणि संशोधन यासारखी कौशल्य विकसित करण्यात मदत करतात.

या परिषदेत भारतीय एमयुएन सर्किट मध्ये लोकप्रिय असलेली एआयपीपीएम समिती आयोजित करण्यात आली होती. सुश्री रितिका कुमार या परिषदेची सरचिटणीस आणि श्री ओम तेलोरे महासंचालक होते. दोघेही एमबीबीएस तृतीय वर्षाच्या विद्यार्थी होते.

Advertisement

अध्यक्षस्थानी पुण्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उदघाटन कॉलेज च्या प्राचार्या डॉ. दीपा नायर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी यांनी केले. डॉ दीपा नायर यांनी आपल्या भाषणात परिषदेचे कौतुक केले आणि सर्वांना प्रोत्साहित केले.

सदर परिषदेमध्ये अखिल भारतीय राजकीय पक्षांच्या बैठकीत “पहलगाम आतंकी हल्ला” या विषयावर चर्चा करण्यात आली. एआयपीपीएम प्रतिनिधींने ऑपरेशन सिंदूर, राष्ट्रीय सुरक्षा आणि हल्ल्या आधी आणि नंतर सरकार नी उचललेल्या पाउलांची चर्चा केली.

एआयपीपीएम च्या समितीने भारतीय संसद सदस्यांच्या भूमिका मांडणाऱ्या प्रतिनिधींमध्ये तीव्र ज्वलंत वादविवाद पहिले. परिषद मध्ये प्रत्येक प्रतिनिधी त्यांच्या क्षमतेनुसार प्रतिनिधित्व करतांना दिसले. झीरो अवर ही भारतीय संस्थेच्या प्रत्यक्ष कामकाजाची अचूक प्रतिकृती होती, जिथे कोणतेही धोरण प्रतिबंधित नव्हते. या परिषदेला पुण्याच्या ८ संस्थेचे एकूण ४० प्रतिनिधी उपस्थित होते. समितीतील सर्वोत्कृष्ट वक्त्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले.

सर्व उपस्थितांसाठी हे संमेलन एक समृद्ध करणारा अनुभव होता आणि अश्या संमेलनांना वारंवार उपस्थित राहण्याची त्यांना अधिक आवड निर्माण झाली.

संस्थेच्या कार्यकारी संचालक डॉ सुचित्रा नागरे, प्राचार्या डॉ दीपा नायर, वैद्यकीय अधीक्षक डॉ दर्पण महेशगौरी आणि समन्वयक प्रशासन डॉ तुषार खाचणे यांच्यासह सर्वांनी आयोजकांचे कौतुक केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page