स्नेहवर्धन पुणे जिल्हा अंतर अद्यापक विद्यालयीन कला क्रीडा स्पर्धेत बाफना डी एड कॉलेज चे नेत्रदीपक यश.
तळेगाव दाभाडे :
इंद्रायणी महाविद्यालय च्या क्रीडागणात जिल्हा क्रीडा स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या.यावेळी उदघाटनपर कार्यक्रमात जिल्हा सचिव प्राचार्या श्रीम उज्ज्वला सावन्त व उपसचिव प्राचार्य हिरामण लंघे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मलघे सर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.यावेळी पुणे जिल्यातील 15 डी एड कॉलेज ने सहभाग नोंदवला. या क्रीडा स्पर्धेच्या वैयक्तिक बाबीमध्ये हरकचंद रायचंद बाफना डी एड च्या आरती पवार -राऊत हिने थाळी फेक मध्ये द्वितीय,मेघराज दिनेश राऊत या विदयार्थ्यांनी गोळा फेक मध्ये द्वितीय तर 4×100 रिले स्पर्धेत अनुक्रमे साक्षी नलावडे, मोनिका कुंभार, स्वेता लोखंडे आणि आरती कारके, सपना चव्हाण व अंकिता कोकणे यांनी तृतीय क्रमांक पटकवला. यावेळी श्री राजेंद्र डोके, डॉ मनोज गायकवाड, सौं शुभांगी हेद्रे, श्रीम शीतल गवई आणि योगेश जाधव यांनी त्यांना मार्गदर्शन केले. श्री नंदकिशोर आणि सोमनाथ धोंगडे यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष श्री तुकाराम असवले आणि सचिव श्री अशोक बाफना यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.