मावळ तालुका खरेदी विक्री संघावर महायुतीचा झेंडा
वडगाव (मावळ )
मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया आज वडगाव मावळ येथे पार पडली यामध्ये महायुतीचे श्री.शिवाजीराव चिंधू असवले यांची सभापती पदी तर मा.श्री.अमोल तुकाराम भोइरकर यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली

याप्रसंगी मावळ तालुका महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून श्री.शिवाजीराव असवले व श्री.अमोल भोइरकर यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..!
याप्रसंगी संत तुकाराम सा.का.उपाध्यक्ष श्री.बापूसाहेब आण्णा भेगडे ,भाजपा मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.रविंद्र आप्पा भेगडे मावळ भाजपा प्रभारी श्री.भास्करराव म्हाळसकर, मावळ भाजपा तालुका अध्यक्ष श्री.दत्तात्रय भाऊ गुंड,पुणे जिल्हा सहकारी बँकेचे मा.संचालक श्री. बाळासाहेबजी नेवाळे, मावळ तालुका रा.काँग्रेस अध्यक्ष श्री.गणेश भाऊ खांडगे,भाजपा कोअर कमिटी अध्यक्ष श्री.निवृत्तीभाऊ शेटे,मा.सभापती श्री.ज्ञानेश्वरजी दळवी साहेब,श्री.राजाराम मामा शिंदे आदींसह मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!






