*वराळे येथे नदीत बुडून मुलाचा मृत्यू*
तळेगाव दाभाडे :
- वराळे ता.मावळ येथील आंबीरोड जवळील इंद्रायणी नदीत सुंदराम सिंग वय(१४वर्ष रा.आंबी) ता.मावळ या मुलाचा मृतदेह आढळून आला. रविवारी (दि.०८) मित्रांबरोबर फिरायला जातो असे सांगून सुंदराम सिंग घराबाहेर निघून गेला तो परत न आल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी मिसिंगची तक्रार तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन येथे दिली होती.पोलिस उपनिरीक्षक भारत वारे यांनी तपास केला असता सुंदराम सिंग इंद्रायणी नदी मध्ये पोहण्यास गेला परंतु पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.त्याचे मित्र गाजावाजा न करता भितीपोटी पळून गेले. श्रीनिवास तळेगावकर या नागरीकाने लहान मुलाचे कपडे नदीकाठी असलेचे वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांना सांगितले यावरुन मृतदेह शोधण्यास वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य निलेश गराडे,भास्कर माळी,गणेश गायकवाड,गणेश सोंडेकर,प्रशांत भालेकर,शुभम यांना सोमवारी (दि.०९) दुपारच्या सुमारास यश आले.पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन करीत आहे.