*ब्राम्हणोली व वारु गावातील ग्रामस्थांचा रोटरी क्लब आयोजित मोफत आरोग्य शिबीरात उस्फूर्त सहभाग*
मावळ :
रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड यांच्या सहकार्याने व शिव विद्या प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली आर. सी. सी. ब्राम्हणोली यांनी वारु व ब्राम्हणोली गावातील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी आयोजित केले होते.
यावेळी रोटरी क्लब पुणे सिंहगड रोडचे अध्यक्ष रोटेरीयन अभय देवरे, रोटेरियन अभय मायदेव, रोटेरीयन श्रीकांत पाटणकर, रोटेरियन विनायक गायकवाड, रोटेरीयन रेणुका पंडीत उपस्थित होते.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया टिम व टिम प्रमुख नितिन दळवी व एच. व्ही. देसाई हॉस्पिटलचे टीम व टीम प्रमुख निखिल देसाई तसेचशिव विद्या प्रतिष्ठानचे संस्था प्रमुख शिल्पा कशेळकर व संतोष वंजारी उपस्थित होते.
आर. सी.सी. ब्राम्हणोली अध्यक्ष योगेश काळे तसेच सदस्य अंकुश काळे, विशाल मोरे, शंकर काळे, संदिप काळे, कविता काळे, आशा वर्कर वैशाली पवार,
जि.प.शाळा शिक्षक एस.एस.ठाकर, ग्रामस्थ नवनाथ काळे तसेच ग्रूप ग्रामपंचायत सरपंच निलम साठे यांनी सहकार्य केले.
यावेळी जनरल आरोग्य तपासणीसाठी 108 ग्रामस्थांनी लाभ घेतला व डोळे तपासणी साठी 102 ग्रामस्थ सहभागी झाले. सर्वांना औषधे, गोळ्या व गरजेनुसार चष्मे यांचे वाटप करण्यात आले. डोळ्याचे ऑपरेशन करण्याची गरज असणाऱ्या ग्रामस्थांसाठी मोफत ऑपरेशनची व्यवस्था करण्यात आली आहे.
आरोग्य तपासणीसाठी सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले.