बोपदेव घाटात वृक्षारोपण कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाचा पर्यावरण दिनानिमीत्त उपक्रम..
कोंढवा, पुणे : कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाकडून पर्यावरण दिनानिमीत्त बोपदेव घाटात वृक्षारोपण करण्यात आले. कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त हेमंत किरुलकर यांच्या हस्ते झाड लावून उपक्रमास सुरवात करण्यात आली. यानिमित्त १५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

Advertisement
सकाळच्या सत्रात हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रशासन अधिकारी राजेश कादबाने, उपअभियंता दत्ता चव्हाण, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राजू दुल्लम, जालिंदर कदम, वृक्ष विभाग प्रमुख विजय नेवसे यांच्यासह कोंढवा-येवलेवाडी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांना यावेळी कार्यालयाच्या वतीने तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
प्रशासन अधिकारी राजेश कादबाने,यांनी उपस्थितांचे आभार मानले.







