अक्षय तृतीया निमित्त “रुद्र याग, चंदन उटी, व महाप्रसादाचे” आयोजन!.
तळेगाव दाभाडे :
वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या “अक्षय तृतीया ” ला ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्ट, तालीम मंडल, उत्सव समिती, गणेश मंडळे, व समस्त गावकरी तळेगाव दाभाडे लोकसहभागातून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि.10 रोजी आयोजन करण्यात येत आहे.
या धार्मिक कार्यक्रमात दि.10 रोजी सकाळी 10 वा. पासून 11 वाजेपर्यंत श्री ची महापूजा, अभिषेक, श्री ची चंदन उटी, रुद्र याग, हे धार्मिक कार्यक्रम होतील दुपारनंतर 4 ते 6 हरिपाठ, श्री डोळसनाथ महाराज भजनी मंडळाचे भजन.होईल आणि सायं,6 ते 8 काळ भैरवाष्टक, जप, नामस्मरण, प्रवचन,दीपमाला प्रज्वलन, आरती, व रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम हा “लोक सहभागातून ” होणार असल्याने जास्तीत जास्त भाविकांनी यात सहभागी होऊन सत्कर्म, करून पुण्यतिथीचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामदैवत, श्री डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्ट, डोळसनाथ तालीम मंडळ, उत्सव समिती, भजनी मंडळे, गणेश मंडळे, व समस्त गावकरी, तळेगाव दाभाडे. यांच्या वतीने करण्यात येत आहे.