स्वर्गीय आमदार दिगंबर भेगडे यांनी सुरू केलेली श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय राजेवाडी दिवड या शाळेचा भूमी पूजनाचा कार्यक्रम संपन्न
दिवड :
सोमवार दिनांक 14 जुलै रोजी स्व. आमदार दिगंबर भेगडे यांनी सुरु केलेली शाळा श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय राजेवाडी दिवड तालुका मावळ जि.पुणे शाळेत नॉर ब्रेम्स कंपनी हिंजवडी पुणे यांच्यावतीने नवीन इमारतीचे भूमी पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत जाधव यांनी प्रास्ताविक केल्यानंतर भूमी पूजनासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे राजू मुऱ्हे, नामदेवराव भजबळकर, रावसाहेब चव्हाण, यदुनाथ चोरगे, दादासाहेब घारे तसेच दिवड गावचे सरपंच गणेश राजीवडे , लहू सावळे (माजी सरपंच), किसन सावळे (माजी सरपंच), राजू सावळे (माजी सरपंच ) देविदास सावळे (उप सरपंच) आणि ज्ञानराज शिक्षण प्रसारक मंडळ कोथुर्णे संचालक मंडळ ज्ञानेश्वर दळवी (अध्यक्ष), उद्धव शेलार, मनोहर भेगडे, ओव्हाळ सर, या सर्वांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले .तसेच शाळेचे भूमी पूजन दिवड गावचे सरपंच गणेश राजीवडे, लहू सावळे, किसन सावळे तसेच सर्वांनी भूमी पूजन केले व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच ज्ञानेश्वर दळवी यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.






