15 तोळे सोन्याचे दागिणे केले परत.. फरासखाना पोलीस स्टेशनची कामगिरी… प्रामाणिक रिक्षाचालकांचा पोलिसांनी केला सत्कार…

SHARE NOW

पुणे :

दिनांक ०८/०६/२०२४ रोजी इसम नामे कृष्णत तानाजी मुळीक वय 35 रा. रहिमतपूर जिल्हा सातारा हे दुपारी ३ वाजता रविवार पेठ येथे खरेदी करून रिक्षाने सोन्या मारुती चौक ते स्वारगेट या ठिकाणी प्रवास करीत असताना त्यांची बॅग रिक्षामध्ये विसरली.

त्या बॅगमध्ये १५ तोळे सोने असल्याबाबत त्यांनी पोलिसांना सांगितले.

सदरबाबत पोलिस उपायुक्त श्री गिल साहेब व सहायक पोलीस आयुक्त श्री खाडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली, तसेच प्रशांत भस्मे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक राजू पवार, सहाय्यक फौजदार उत्तम कदम, पोलीस अमलदार शशिकांत ननावरे यांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचा तात्काळ शोध घेतला. रिक्षा चालक रोहित भगवान काकडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सदरची बॅग त्यांच्याकडे असलेल्या बाबत सांगितले व सदरची बॅग त्यांनी स्वत हुन पोलीस ठाणे येथे आणून दिली.

Advertisement

सदरची बॅग कृष्णत मुळीक यांना ओळख पटवून परत करण्यात आली. त्यावेळी त्यांनी पोलिसांचे व रिक्षा चालकाचे आभार मानले.यावेळी प्रशांत भस्मेवरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी सांगितले की, सदर रिक्षा चालकांनी आपल्या गाडीत सापडलेली बॅग प्रामाणिकपणे आणून दिली त्या रिक्षाचालकांचे पोलिसांच्या वतीने कौतुक करण्यात आले. सदर प्रामाणिक रिक्षा चालकांचा सर्वांनी आदर्श घेण्यासारखा आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून पोलीस सदैव तत्पर असतात. असे मत त्यांनी व्यक्त केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page