चिंचवड येथे अज्ञातांनी केला तरुणीचा खून

SHARE NOW

पिंपरी चिंचवड:

दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सतरा वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. ११) रात्री नऊच्या सुमारास कृष्णाई कॉलनी, वाल्हेकरवाडी येथे घडली.

खून झालेल्या तरुणीचे नाव कोमल भारत जाधव (वय १७, रा. कृष्णाई कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आहे. याप्रकरणी तरुणीचा मामा सचिन बिभीषण माने (वय ३९, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी आदिती हिने फोन करून कळवले की, कोमल दिदीला दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येऊन चाकूने हल्ला केला असून ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडली आहे.

त्यावरून फिर्यादी सचिन माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कोमलला आपल्या वाहनातून ऑक्सीकेअर रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी कोमलला पाहून तातडीने वायसीएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, वायसीएम रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करत आहेत.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page