*रोटरी क्लबचा डीजी व्हिजीट,पुरस्कार समारंभ उत्साहात संपन्न*
तळेगाव दाभाडे येथे रोटरी क्लब अॉफ तळेगाव एमआयडीसीचा डिस्ट्रीक गव्हर्नर व्हिजीट आणि पुरस्कार समारंभ शनिवारी(दि.१०)उत्साहात संपन्न झाला.सुरवातीस सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे,अध्यक्ष मिलिंद शेलार,माजी अध्यक्ष रजनीगंधा खांडगे,राहुल खळदे,हिरामण बोत्रे,अजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी सांगितले की जिल्हा अध्यक्ष शितल शहा यांच्या मार्गदर्शना खाली रोटरी क्लब अॉफ तळेगाव एमआयडीसीने विविध प्रकल्पाद्वारे समाजात ठसा उमटविला आहे तसेच आरोग्य,शिक्षण,पर्यावरण महिला सक्षमीकरण,विवेक विकास आदी क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.यावेळी रोटरीचे जिल्हा अध्यक्ष शितल शहा यांनी मनोगतात सांगितले की जगात सुमारे २१४ देशात ४८ हजार रोटरी क्लब असून १४लाख रोटरी सभासद आहेत.महिलांनी आणि युवकांनी रोटरी क्लबचे सभासद झाले पाहीजे,यावेळी विविध ५१ प्रकल्पाचे डीजी रिपोर्ट सादरीकरण केले.बूलेटीन प्रकाशन समारंभ झाला.नवीन सदस्यांना पिनअप करण्यात आले.रोटरी फाउंडेशनला संतोष खांडगे यांच्या वतीने एक हजार डॉलर (रु.८५०००)आणि रजनीगंधा खांडगे यांच्या वतीने एक हजार डॉलर (रु.८५०००)प्रदान करण्यात आले.यावेळी महेश निंबाळकर आणि शेखर गाणू यांना पुरस्कार देण्यात आले.सुत्रसंचालन अमृता झा यांनी केले.प्रवीण भोसले यांनी आभार मानले.