कामशेत मधील आठवडे बाजारातील अवैध वसुली कोण करत आहे? या गैर प्रकाराची चौकशी करण्याची मागणी अभिमन्यू शिंदे यांनी केली आहे
कामशेत:
कामशेत शहरात दर मंगळवारी आठवडे बाजार भरत असतो. कामशेत ग्रामपंचायत मार्फत विक्रीसाठी आलेल्या शेतकरी व व्यापारी यांना शंभर रुपयाची पावती दिली जाते. परंतु काही व्यापाऱ्यांकडून मात्र पन्नास रुपये पावती न देता घेतले जातात. तर काहींना जुन्या पावत्या दिल्या जातात. ही रक्कम कोणाकडे जमा होते? माजी सरपंच अभिमन्यू प्रकाश शिंदे व काही स्थानिक नागरिक मंगळवारी आठवडे बाजारात जाऊन व्यापारांकडे व शेतकऱ्यांकडे चौकशी केली असता हा गैरप्रकार उघडकीस आला आहे. याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी सरपंच अभिमन्यू प्रकाश शिंदे यांनी गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्याकडे केली आहे. गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की आठवडे बाजारात बाहेरगावातून शेतकरी व विविध व्यापारी दर मंगळवारी येत असतात. कामशेत ग्रामपंचायतच्या वतीने त्यांच्याकडून शंभर रुपयाची रक्कम घेऊन पावती दिली जाते मात्र या प्रकरणी लाखो रुपयांच्या गैरव्यवहार झाला असून याबाबत चौकशी करून संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी अभिमानी शिंदे यांनी केली. कामशेत मधील आठवडे बाजारातील अवैध वसुली कोण करत आहे? असा प्रश्न कामशेत मधील नागरिकांना पडला आहे.