तळेगावात दिव्यांग कल्याण निधी व सानुग्रह अनुदान वितरण कार्यक्रम संपन्न झाला
तळेगाव दाभाडे:तळेगाव दाभाडे येथे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मार्फत शनिवार दिनांक ३१मे २०२५ रोजी सकाळी ९: वाजता नगरपरिषद कार्यालयात दिव्यांग कल्याण निधी व सानुग्रह अनुदान वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वित्तीय वर्ष २०२५/२६ करिता प्राप्त झालेल्या छाननी दिव्यांग प्रतिनिधी छाननी समितीमार्फत करण्यात आली. या प्रक्रियेनंतर एकूण २८३ UDID कार्डधारक दिव्यांग लाभार्थींची निवड करण्यात आली. त्यानंतर एकूण ९०लाख रुपयाच्या निधीच्या प्रारूप धनादेश प्रतिनिधीक स्वरूपात वितरित करण्यात आला. सदर अनुदान हे आर्थिक वर्षासाठी एक रकमी स्वरूपात देण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आर्थिक मदतीसोबत सक्षमीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामुळे त्यांचा समाजात सक्रिय सहभाग वाढवण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे. या दिव्यांग कल्याण निधी व सानुग्रह अनुदान वितरण कार्यक्रमास मावळचे आमदार सुनील शेळके. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक. उपमुख्याधिकारी ममता राठोड, दिव्यांग संघटनेचे प्रमुख पृथ्वीराज चव्हाण. विविध दिव्यांग लाभार्थी व नगरपरिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी. कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व लाभार्थी दिव्यांग बांधवांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाचे मनःपूर्वक आभार यावेळी व्यक्त केले.