कामशेत पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी मावळातून पावणे तीन लाखांचे ज्वलनशील केमिकल व पांढऱ्या रॉकेलचा साठा जप्त
कामशेत :
मावळातून पावणे तीन लाखांचे ज्वलनशील केमिकल व पांढऱ्या रॉकेलचा साठा जप्त करण्यात आला. बुधवारी (दि. २९) रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मुंढावरे (ता. मावळ) गावच्या हद्दीतील इंद्रायणी ढाब्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंढावरे गावात इंद्रायणी ढाब्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत केमीकलचा व पांढऱ्या रॉकेलचा अवैध साठा केल्याची गोपनीय माहीती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि. २९) रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी पोलीस पथक, पंच व पुरवठा निरीक्षक तनपुरे यांच्या पथकाने छापा टाकला. तेथे २८ बैरैलमध्ये २ लाख ८८ हजार ६०० रुपये किमतीचे अंदाजे ४ हजार ८१० लीटर ज्वलनशिल केमीकल सदुष्य द्रव्य तसेच पांढरे रॉकेल सदृश्य पदार्थ असे बेकायदेशीररित्या साठा करून ठेवल्याचे आढळले. सदरचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला असून आरोपी महेंद्र काळुराम चौधरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील हे करत आहेत.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील तसेच सहा. पोलीस निरीक्षक सतिष पाटील, सहा. फौजदार नितेंद्र कदम, पोलीस हवालदार समिर करे, गणेश तावरे, पो. कॉ. प्रतिक काळे, गणेश ठाकुर, पोकॉ निशा लालगुडे यांच्या पथकाने केली.