*नवलाख उंबरे येथे दारू विक्रीप्रकरणी एकास अटक*
मावळ :
मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथे विनापरवाना देशी दारू विक्री करणाऱ्या चेतन तुळशीराम दरेकर (वय ३५), नवलाख उंबरे याला तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी(दि.०९) मुद्देमालासह अटक केली आहे. दरेकरकडे देशी दारूच्या बाटल्या विक्रीसाठी जवळ ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विवेक गोवारकर, पोलिस हवालदार अनंत रावण, पोलिस कॉन्स्टेबल विनायक शेरमाळे आणि रमेश घुले यांनी नवलाख उंबरे परिसरात छापा टाकला. या कारवाईदरम्यान चेतन दरेकर याच्याकडे विनापरवाना देशी दारू आढळून आली. दारू विक्रीसाठी जवळ ठेवण्यात आली असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.