मावळ मधील बेबड ओहळ येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक
बेबड ओहळ :
मावळ तालुक्यातील बेबड ओहळ येथे गांजा विक्रीसाठी आलेला अमीर सत्तार बेग ( वय. ३०. राहणार जांबे मुळशी) या तरुणाला शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ११ हजार ६०० रुपये किमतीचा २३२ ग्रॅम गांजा आणि २७ हजार रुपये किमतीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून .ही कारवाई रविवार दिनांक ७ जुन २०२५ रोजी रात्री बेबड ओहळ या गावात करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रितेश कोळी यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.सध्या मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी गांजाची तस्करी सुरू आहे असे अनेक नागरिकांनी सांगितले. तळेगाव दाभाडे. वडगाव. कामशेत. लोणावळा या शहराबरोबर मावळ मधील ग्रामीण भागात गांजा पिण्याचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये कॉलेज मधील तरुण व शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गांजाचा व्यसनाने अनेक तरुणांचे आयुष्य बरबाद झाले असून. अनेक तरुण हे वाम मार्गाला जात आहे. ही गोष्ट फारच चिंताजनक आहे.