*सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन.*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे मस्करनेस कॉलनी येथील सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माध्यमिक विभागातील पालकांची शैक्षणिक वार्षिक सभा घेऊन वृक्षारोपण करत नवीन वर्षाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी मिळून आयुर्वेदिक व काही उपयोगी अशा झाडांचे रोपण शाळेतील आवारात केले गेले. पर्यावरणाचे रक्षण देखील एक शिक्षणाचा भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन केले होते.
शैक्षणिक वार्षिक सभेमध्ये माध्यमिक विभागातील शिक्षणाचे वार्षिक धोरण तसेच वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, प्रकल्प, स्पर्धा यांचे नियोजन पालक आणि विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.