# देहूरोड येथे ७० वर्षापासून असलेल्या सेंट्रल हॉटेल सह अन्य ५ अनधिकृत दुकाने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून जमीन दोस्त करण्यात आली#
देहूरोड: पुणे मुंबई महामार्ग वरील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील संविधान चौकातील ७० वर्षापासून असलेल्या सेंट्रल हॉटेल सह अन्य ५ अनाधिकृत दुकाने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून बुधवार दिनांक ४जून २०२५ रोजी सकाळी बोर्डाच्या अतिक्रमण पथकाने चार जेसीबी व लष्करी बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली . ही दुकाने भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या मालकीच्या बी 4 म्हणून वर्गीकृत असल्याने निकसित करण्यात येणार असल्याबाबतच्या नोटिसा बोर्डाने संबंधित अनधिकृत दुकानदारांना बजावल्या होत्या. या नोटिसांना संबंधित दुकानदारांनी पुणे न्यायालयात दीर्घकाळ चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने संबंधित अनाधिकृत दुकानदारांना मालमत्ता निकसीत करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशाने बोर्डाने संबंधित दुकानांचा ताबा घेऊन चार जेसीबी व मजुरांच्या साह्याने सदरील अनाधिकृत दुकाने व सेंट्रल हॉटेल बुधवारी जमीनदोस्त केली. गेल्या अनेक वर्षापासून येथे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या या कारवाईमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात बोलताना देहूरोड भाजपाचे अध्यक्ष रवींद्र शेलार म्हणाले की देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत बाजारपेठेसह ८०ते ९० मालमत्ता निकसित करण्याचे आदेश असताना त्यांच्यावर अतिक्रमणविरोधी कारवाई न करता केवळ सेंट्रल चौकातील दुकानांवर बोर्डाने कारवाई केली हे चुकीचे असून सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. या कारवाई चा शेलार यांनी जाहीर निषेध केला आहे.