संवेदना बोथट झालेल्या मनाला जागृत करणारा दीर्घांक ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’ कलापिनी रंगवर्धनचा यशस्वी प्रयोग

SHARE NOW

तळेगाव दाभाडे.

कलापिनीच्या रंगवर्धन या प्रायोगिक नाटकांच्या उपक्रमाअंतर्गत ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’ हा गंभीर विषय घेऊन प्रबोधन करणारा आणि कृतिप्रवण करायला शिकविणारा दीर्घांक यशस्वी रित्या सादर करण्यात आला. कलापिनीच्या अवकाश रंगमंच या समीप रंगमंचावर प्रयोग झाला.

संवेदना बोथट झालेल्या माणसांच्या गर्दीत जेव्हा टेंगशेसारखा संवेदनशील माणूस वावरतो तेव्हा त्याची जी घुसमट होईल ती या दीर्घांकामधून अतिशय समर्पक रित्या दाखवण्यात आली. आजूबाजूला सतत काहीतरी चुकीचं घडतयं, कधी आपल्यासमोर तर कधी आपल्या अपरोक्ष, पण आपण फक्त बघ्याची भूमिका घेतोय ह्याची जाणीव कुठेतरी मनाला कुरतडते. त्यातून येणारी घुसमट, तगमग जयंत पवार यांच्या लेखणीतून जाणवते. हे एक दारुण वास्तव आहे की स्वतः अन्यायाचा प्रतिकार करावा असे वाटत नाही. या धकाधकीच्या जीवनाला ट्रेन हे प्रतीक अगदी योग्य वाटते. कोणाचे काहीही होऊ दे, हि ट्रेन आपल्याच नादामध्ये काही न ऐकल्यासारखे, न पाहिल्यासारखी, चालतच असते. कुठेतरी खोलवर विचार केला तर लक्षात येते कि हे आपलेच प्रतिबिंब आहे. कारण आपणही वास्तव आयुष्यात फक्त घटना घडल्यावर चर्चा करतो पण कृती करत नाही. काही दिवसांनी तो विषय फक्त एक भूतकाळ बनतो. या सगळ्या भावभावना दीर्घांकात पाहून प्रेक्षागृहात शांतता पसरली होती.

Advertisement

कुंदन शिशुपाल, कृष्णा गोरे, मनोज इंगळे, सारंग मैदंरगी, योगेश वैद्य, दीपाली जोशी, अपूर्वा गुरव, जान्हवी पावसकर, ज्योती गोखले, विद्या अडसुळे, ऋचा पोंक्षे, , गणेश पाटील, अरुंधती देशपांडे, ओंकार गुरव, साई गुरव या कलाकारांनी हा अवघड विषय अतिशय उत्कृष्ट रित्या आपल्या अभिनयातून मांडला. संदीप समर्थ यांनी टेंगशे हे मुख्य पात्र आपल्या समर्थ अभिनयातून सादर केले. आर्या पंडित यांचे पार्श्वसंगीत संयोजन वाखाणण्याजोगे. चाकोरीबाहेरचा विषय निवडून त्यावर नाटक बसवणे हे शिवधनुष्य दिग्दर्शक चेतन पंडित याने यशस्वी रित्या पेलले.

विराज सवाई आणि डॉ विनया केसकर यांनी संयोजन केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page