सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध मागण्यांसाठी आमदारांना निवेदन.
वडगाव मावळ (ता.०५) : सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव मावळ येथील नवीन प्रशासकीय इमारतीस मावळ तालुक्याचे प्रथम आमदार श्रीमंत सरसेनापती विरधवलराजे यशवंतराव दाभाडे यांचे नाव देण्याबाबत आणि तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या नूतन वास्तू मध्ये सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि ऐतिहासिक कलादन उभे करण्यासंदर्भात आमदार सुनील शेळके यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.