विश्वा स्पोर्ट्स अकादमी या संस्थेच्या वतीने *स्व संरक्षण काळजी गरज* या विषयावर कराटे प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पालक यांचा पोलिस अधिकारी आणि पत्रकार यांच्याशी संवाद हा कार्यक्रम संपन्न
पिंपरी चिंचवड :
पिंपरी चिंचवड शहरातील एक नामवंत कराटे प्रशिक्षण केंद्र *विश्वा स्पोर्ट्स अकादमी* या संस्थेच्या वतीने *स्व संरक्षण काळजी गरज* या विषयावर कराटे प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पालक यांचा पोलिस अधिकारी आणि पत्रकार यांच्याशी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम दिनांक १ सप्टेंबर रविवारी सकाळी अकरा वाजता आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराच्या शेजारील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या वेळी पालकांशी संवाद साधताना विधानसभा परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांनी प्रमुख मार्गदर्शक करताना सांगितले आज समाजात विकृती चे प्रमाण वाढले असून कोणतेही सरकार प्रत्येक नागरिकाला व्यंयतीक संरक्षण पुरुवू शकत नाही त्यामुळे आज स्व संरक्षण हे काळाची गरज आहे तसेच त्यांनी त्यांच्या आज पर्यंतच्या एक महिला जो अनुभव समाजात वावरताना मिळाला याची विविध उदाहरणे त्यांनी दिली.निगडी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक महेश सातपुते यांनी संरक्षण विषयांचे कायदे सांगितले आणि कोणत्याही महिलेला अथवा मुलीला विकृती असलेल्या व्यक्ती कडून त्रास झाला तर तिने प्रथम काय केले पाहिजे यांचे मार्गदर्शन केले आणि पालकांना विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
पिंपरी चिंचवड शहरातील तरुण महिला पत्रकार विजया गिरमे बोलताना म्हणाल्या की त्या स्व:हा कराटे या खेळात ब्लॅक बेल्ट असुन आताच्या धक्का धक्की च्या जिवनात कराटे प्रशिक्षण घेणे हे किती महत्त्वाचे आहे याचे मार्गदर्शन केले आणि पालक महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना अत्यंत थोडक्या शब्दात समाजावून सांगितले या वेळी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि मुक्त पत्रकार नंदकुमार भोगले यांनी पालक आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना पालकांनी आपल्या पाल्याच्या शाळेत महिन्यातून एकदा संपर्क साधावा तसेच समाजात वावरताना विशेषतः महिला व मुलींनी कोणत्याही रस्त्यावरील विक्रेत्याला आपला मोबाईल नंबर देऊ नये, तसेच आपल्या मुलांशी संवाद वाढविणे ही खरी काळाची गरज आहे असे सांगताना पत्रकारितेतील काही अनुभव सांगितले आणि पालकांनी सुध्दा त्यांच्या दैनंदिन जीवनात येणार अनुभव सांगितले या वेळी कराटे या खेळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा पदक, प्रमाणपत्र, आणि भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार उमाताई खापरे, पोलिस उपनिरीक्षक महेश सातपुते, पत्रकार विजया गिरमे आणि मुक्त पत्रकार नंदकुमार भोगले, आकुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश भागवत आणि कराटे प्रशिक्षण केंद्रातील मुख्य प्रशिक्षक अभिषेक नलावडे आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नितीन वायकुळे, ज्ञानदेव सांडव यांचे विषेश सहकार्य लाभले.